+91 9209041154 connect@omkarfoundation.org महा. 1374/2015/पुणे (Reg. No. 27199)
सूचना
🌿 ओंकार फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे! • पर्यावरण संवर्धन, मोफत आरोग्य शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण सहाय्य आणि समाजकल्याण कार्यासाठी आपले योगदान अमूल्य आहे • स्वयंसेवक नोंदणी व देणगी सुरू आहे • अधिक माहितीसाठी संपर्क: +91 9209041154

संस्थेबद्दल (About Us)

मुख्य पान / संस्थेचा परिचय, ध्येय आणि नेतृत्व

आमचा इतिहास, प्रवास व प्रेरणा

१०+ वर्षे अखंड निस्वार्थ समाजसेवेचा संकल्प

ओमकार फाउंडेशन & Charitable Trust ची स्थापना १२ ऑक्टोबर २०१५ रोजी समाजातील उपेक्षित, दुर्बल आणि ग्रामीण भागातील गरजू घटकांना सक्षम बनवण्याच्या उदात्त ध्येयाने झाली. संस्थापक अध्यक्ष श्री. ओंकार प्रशांत डोके यांच्या दूरदृष्टीने आणि समर्पित सहकाऱ्यांच्या साथीने सुरू झालेला हा प्रवास आज राज्यभरात हजारो नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारी एक लोकचळवळ बनली आहे.

केवळ तात्पुरती आर्थिक मदत न करता व्यक्ती आणि गावाला स्वावलंबी बनवणे, व्यापक वृक्षारोपण व जलसंधारणाद्वारे भावी पिढीला सुजलाम्-सुफलाम् निसर्ग देणे, प्रत्येक बालकाच्या हाती शिक्षणाची पाटी देणे आणि गोरगरिबांपर्यंत मोफत आरोग्यसेवा पोहोचवणे हा संस्थेचा मुख्य गाभा आहे.

संस्थेने गेल्या दशकात ५०,०००+ हून अधिक झाडांचे यशस्वी रोपण व संवर्धन केले असून, ५०+ पेक्षा जास्त मोफत महा आरोग्य शिबिरांद्वारे हजारो रुग्णांवर उपचार व नेत्र शस्त्रक्रिया केल्या आहेत.

ट्रस्टची अधिकृत वैधानिक व शासकीय नोंदणी:

नोंदणी क्रमांक: महा. 1374/2015/पुणे (Reg. No. 27199)
स्थापना दिनांक: १२ ऑक्टोबर २०१५ (संस्था नोंदणी अधिनियम १८६०)
८०-जी आयकर सवलत: AABTH4722RF20211
१२-ए नोंदणी क्र.: AABTH4722RE20211
पॅन कार्ड (PAN): AABTH4722R
अधिकृत सीए ऑडिट: दरवर्षी धर्मादाय आयुक्त व आयकर विभागाकडे नियमित ऑडिट अहवाल सादर.
ओमकार फाउंडेशन उपक्रम
१०+ वर्षे
अखंड सेवा व शाश्वत परिवर्तन

आमची दृष्टी (Our Vision)

एक असा समाज जिथे प्रत्येक नागरिक निरोगी, सुशिक्षित आणि निसर्गाशी सुसंवादी जीवन जगेल. कोणतीही व्यक्ती गरिबीमुळे शिक्षणापासून किंवा उपचारांअभावी आरोग्यापासून वंचित राहणार नाही.

आमचे ध्येय (Our Mission)

पारदर्शक आणि तत्पर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना थेट मदत पोहोचवणे, व्यापक वृक्षारोपण मोहिमेद्वारे पर्यावरणाचा समतोल राखणे आणि तरुणांमध्ये समाजसेवेची ऊर्जा जागृत करणे.

विश्वस्त व नेतृत्व

संस्थेचे विश्वस्त मंडळ (अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव)

संस्थेच्या प्रत्येक धोरणाला व उपक्रमाला दिशा देणारे आमचे आदरणीय विश्वस्त व मार्गदर्शक मंडळ.

श्री. ओंकार प्रशांत डोके

अध्यक्ष

"शिक्षण, पर्यावरण आणि शाश्वत सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे जीवन समृद्ध करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

+91 9209041154
omkarfoundation5@gmail.com

श्री. प्रशांत शांताराम डोके

उपाध्यक्ष

"प्रत्येक उपक्रमात पारदर्शकता, गुणवत्ता आणि थेट गरजूंना मदत पोहोचवणे हीच ओंकार फाउंडेशनची ओळख आहे."

+91 9209041154
omkarfoundation5@gmail.com

सौ. पूजा प्रशांत डोके

खजिनदार / कोषाध्यक्ष

"संस्थेच्या प्रत्येक निधीचा विनियोग १००% प्रामाणिकपणे आणि समाजाच्या कल्याणासाठीच केला जातो."

+91 9209041154
omkarfoundation5@gmail.com
सन्मान व गौरव

पुरस्कार आणि सन्मान (Awards & Recognition)

प्रशासकीय व सामाजिक पातळीवर संस्थेच्या कार्याचा झालेला गौरव:

महाराष्ट्र पर्यावरण भूषण सन्मान

वर्ष: २०२५ | राज्यस्तरीय गौरव

५००० हून अधिक देशी वृक्षांची यशस्वी लागवड आणि १००% संवर्धन केल्याबद्दल विशेष राज्यस्तरीय गौरव.

आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार

वर्ष: २०२४ | जिल्हा प्रशासन

ग्रामीण भागात नियमित मोफत आरोग्य शिबिरे व आपत्ती व्यवस्थापनात तत्पर मदतीसाठी जिल्हास्तरीय सन्मान.

ज्ञानज्योती शैक्षणिक सेवा गौरव

वर्ष: २०२३ | शिक्षण परिषद

दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व किट वाटपाच्या उपक्रमासाठी सन्मानित.

मुख्य पान संस्थेबद्दल
उपक्रम
देणगी संपर्क